जागतिक महिला दिन ‘आई कॉलेज’ च्या दारी.

मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर
January 17, 2023

जागतिक महिला दिनानिमित्त ‘आई कॉलेजच्या दारी’ हा अनोखा उपक्रम गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक यांच्या वतीने दि. ११ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी व्यासपीठावर मा. श्री.कृष्णाजी भगत साहेब, संचालक मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक, प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ, उपप्राचार्य प्रा.आर.व्ही.पवार, सौ.शकुंतला कृष्णाजी भगत,  सौ.सविता पुंडलिक रसाळ, प्रा. दिपाली सूर्यवंशी हे विराजमान होते.

मा.सिमंतिनी माणिक कोकाटे, सौ.तेजस्विनी हेमंत वाजे, , हिरकणी महिला मंडळ व माता पालक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या. ‘आई कॉलेजच्या दारी’  या अनोख्या उपक्रमांतर्गत आलेल्या महिला माता पालकांना फळे- वनस्पती यांचे बीज वाण म्हणून देण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.रसाळ सरांच्या पर्यावरण जागृती सजगते मधून हि संकल्पना राबविली गेली. हळदी- कुंकवाच्या पारंपारिक सोहळ्याबरोबर महिला माता पालकांमध्ये त्यांच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आरोग्याविषयी जागृती करण्यात आली.

प्रा.प्रकाश पांगम यांनी माता पालकांशी प्रश्न-उत्तराच्या रूपाने संवाद साधला. महिला ही आई, मुलगी, सून, सासू, मैत्रीण,सहचारिणी- पत्नी अशा विविध नात्यांना सांभाळत असते. हे सर्व सांभाळत असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आपल्या मुलीची मैत्रीण म्हणून कसा संवाद साधता येईल?  मुलींशी मासिक पाळी, त्या कालावधीत होणारे शरीरातील बदल, मानसिक आरोग्य याची शास्त्रीय माहिती माता पालकांना करून दिली. महिलांच्या शरीरातून मासिक पाळी या नैसर्गिक क्रियेतून होणारा रक्तस्राव, त्यातून बाहेर पडणाऱ्या लोहाचे प्रमाण व ते भरून येण्यासाठी आहारात कोणकोणत्या पालेभाज्या, ऋतूनुसार उपलब्ध फळे, दुध हे घटक असावे. या विषयी जागृती महिलांमध्ये करण्यात आली.

आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण, हिमग्लोबीन, रक्त निर्मिती याविषयी चर्चा केली.रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे अनेमिया सारखे कॅन्सर सारखे आजार होऊ शकतो. पोटातील जंत, त्यांचा शरीरात होणारा प्रवेश, त्यापासून होणारे आजार व जन्तापासून बचाव याविषयी माहिती हितगुज करण्यात आली.

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट यांच्या वतीने संस्थापक दीपक मोरेश्वर नाईक यांनी माता –पालक विद्यार्थी रक्त विषयक चाचणी अल्प दरात करून दिल्या जातील असे कळविले आहे. या संस्थेच्या वतीने महाविद्यालयाची सामंजस्य करार करण्याचे प्रस्ताव केला आहे.

कुटुंबाचे आरोग्य हे आईच्या हाती असते. आरोग्य कसे बळकट करावे. उघड्यावरील खाद्य पदार्थ, अस्वच्छता, वापरले जाणारे तेल , बाहेरचे खाणे टाळावे हि माहिती देण्यात आली.

आपल्या शरीरातील रक्त निर्मिती, रक्तातील हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, पांढऱ्या व लाल पेशी त्यांचे जीवनमान या घटकांची शास्त्रीय माहिती दिली. आपल्या शरीरात रक्ताचे विविध प्रकारचे आजार, कॅन्सर कोणत्या कारणामुळे होतात व त्यासाठी आपण काय दक्षता घेतली पाहिजे?

तरुणांमध्ये विवाह करते वेळेस दोघांनीही रक्त तपासणी करून भविष्यातील पिढीच्या आरोग्य विषयी जागृत होणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळतात. याचे उदाहरण त्यांच्या अनुभवातून दिले. आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी आपल्या आहारात काळी खजूर, मनुके, गुळ शेंगदाणे, डाळिंब यासारख्या पदार्थांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, ऋतूनुसार उपलब्ध असणारी फळे यांचे नियमित भरपूर सेवन करावे.

मानवाच्या शरीरातील जंत, अमेबिया यासारख्या जीव- जंतूंचा शरीरातील प्रवेश मानवाच्या आरोग्यास कसा हानिकारक आहे. तसेच आपल्या शरीराची वाढ या जंतू संसर्गामुळे होत नाही. त्यासाठी पिण्याचे पाणी स्वच्छ, गाळून, उकळून थंड करून प्यावे.  तसेच दर 4 महिन्यांनी जंतावरील औषधे नियमित घ्यावीत. याबाबत डॉ. प्रकाश पांगम सरांनी मार्गदर्शन केले. आपल्या घरी आईने बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी कसे पोषक असतात? याची जाणीव करून दिली.  योग्य पोषक आहार व व्यायाम हा तरुणांसाठी खूप महत्त्वाचा आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ सर यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. रक्तदान करताना आवश्यक असणाऱ्या बाबींचा उल्लेख करण्यात आला. मुला-मुलींची विवाह पूर्वी रक्त चाचणी पुढील अपत्याच्या आरोग्यासाठी कशी महत्वाची आहे. ते माता पालकांना पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. दिपाली सूर्यवंशी यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. स्मितल मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *