डॉ दिलीप वाणी (MD Pathology)
थलेसिमिया मुक्त भारत Incharge
सालाबादप्रमाणे जनकल्याण रक्तकेंद्र परीवाराचा “वार्षिक अभ्यासवर्ग” दि.५,६ मार्च,२०२५ रोजी कै.वामनराव ओक
रक्तकेंद्र येथे संपन्न झाला.या अभ्यासवर्गाचे मुख्य आकर्षण होते “इलेक्ट्राॅनिक हिमोग्राम(CBC) वाचून थॅलेसेमियाचे निदान कसे करायचे याचे सर्वांसाठी प्रशिक्षण” ! सर्व देशभरात विशेषत: गुजरात व महाराष्ट्रात हे प्रशिक्षण देणारी संस्था कोणती ? वाचा.
या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने “आश्रय” सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक न्यास,ठाणे” या संस्थेचे अध्यक्ष
डाॅ.दीपक मोरेश्वर नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा व साक्षात त्यांच्याच मुखातून त्यांच्या संस्थेच्या “थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र” या अभियानाची माहिती घेण्याचा सुवर्णयोग आला.
माझ्या मते डाॅ.दीपक मोरेश्वर नाईक म्हणजे प्रति मा.बाळासाहेब ठाकरेच ! प्रथमदर्शनीच ते कोणी न सांगताच कळते.त्यांचे बोलणे सुरू झाले की हा उत्साहाचा प्रचंड मोठा “धबधबा” असल्याचे क्षणात जाणवते.त्यांचे “थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र” हे काम खुजे वाटावे इतका त्यांच्या अन्य कार्याचा “आवाका” आहे.ही व्यक्ती एवढी “एनर्जी” आणते तरी कुठून ? आज त्याचा शोध लागला.कारण घरीच “अन्नपूर्णा” ठाण मांडून बसलेली आहे !
“सगळी सोंगे आणता येतात ! पण पैशाचे सोंग कसे आणायचे ?” हे त्यांचे वाक्य हृदयाला जाऊन भिडले.आपला अनुभव असा नाही.जनता “जगन्नाथाच्या रथा” ला सर्वांनाच हात लावायचे असतात.त्यामुळे “थॅलेसेमियामुक्त भारत” या “जगन्नाथाच्या रथा” ला सर्वजण नक्कीत “हातभार” लावतील.गरज आहे ती समाजाचे “प्रबोधन” करण्याची !