डॉ दिलीप वाणी (MD Pathology)
थलेसिमिया मुक्त भारत Incharge
सालाबादप्रमाणे जनकल्याण रक्तकेंद्र परीवाराचा “वार्षिक अभ्यासवर्ग” दि.५,६ मार्च,२०२५ रोजी कै.वामनराव ओक रक्तकेंद्र येथे संपन्न झाला.या अभ्यासवर्गाचे मुख्य आकर्षण होते “इलेक्ट्राॅनिक हिमोग्राम(CBC) वाचून थॅलेसेमियाचे निदान कसे करायचे याचे सर्वांसाठी प्रशिक्षण” !राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती,महाराष्ट्र प्रांत या संस्थेने नुकतेच “थॅलेसेमियामुक्त भारत” हे अभियान अंगिकारले असून त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर “मनुष्यबळ निर्मिती” आवश्यक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे “स्वयंसेवक” कुठल्याही क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा उमटवतात.त्यामुळे “थॅलेसेमियामुक्त भारत” या अभियानासाठी “प्रशिक्षित स्वयंसेवक” निर्माण करणे हे या अभ्यासवर्गाचे एक प्रमुख लक्ष होते.
जे “थॅलेसेमिया” या विषयात संपूर्णपणे “अनभिज्ञ” आहेत अशा “स्वयंसेवकां” ना या विषयातले “तज्ञ” बनविणे असा या”अनभिज्ञ ते तज्ञ” अशा अनोख्या “प्रवासाचा शुभारंभ” या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने झाला ही “थॅलेसेमियामुक्त भारत” या अभियानासाठी मोठीच “उपलब्धी” समजावी लागेल.सर्व स्वयंसेवकांना “शुभास्ते पंथान” !
या अभ्यासवर्गात संपूर्ण महाराष्ट्रातील जनकल्याण रक्तकेंद्र परीवारीत निवडक ३५ डाॅक्टर्स,तंत्रज्ञ व नर्सेस यांना इलेक्ट्राॅनिक हिमोग्राम(CBC) वापरून “थॅलेसेमियाचे निदान” कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.हे ३५ “सरदार” आता महाराष्ट्रातील विदर्भ,मराठवाडा,कोकण,उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात असंख्य “मावळे” निर्माण करतील व थॅलेसेमियाविरूध्दची लढाई जिंकतील यात कुणाच्याही मनात आता शंका राहू नये.अब दिल्ली दूर नहीं !
“थॅलेसेमियामुक्त भारत” हा हिमालयाएवढा मोठा “दुर्ग” सर करण्यासाठी आता “आश्रय” सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक न्यास,ठाणे हा संस्थारुपी “सहाद्रीचा कडा” मदतीसाठी साक्षात समोर ठाकला आहे.त्यामुळे “थॅलेसेमियामुक्त भारत” हे तो “श्रींची इच्छा” आहे असे आता वाटू लागले आहे.सांगतो “आश्रय सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक न्यास,ठाणे” या संस्थेबद्दल पुढील लेखात !