आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट आणि गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, महाविद्यालय सिन्नर, नाशिक साजरा येथे’वसुंधरा दिन- 22 एप्रिल’- ‘Planet vs Plastic’ साजरा.

पोलीस बातमी पत्राचे संपादक व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट चे संस्थापक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसोफी पदवी बहाल
January 8, 2025
आश्रय सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट,ठाणे व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर,जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक झाड आईसाठी’ मोहीम (दि. ०६.०८.२०२४)
January 9, 2025

गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, नाशिक यांच्या महाविद्यालयातील भूगोल विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (NCC-ARMY WING) , राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसुंधरा दिन- 22 एप्रिल’ उपक्रम 22 एप्रिल 2024 रोजी साजरा करण्यात आला.

बदलते पर्यावरणवाढती उष्णता आणि मानवाच्या आरोग्य विषयी निर्माण होणारे प्रश्न  या विषयावर आश्रय ट्रस्टचे आरोग्य विभाग, कार्यकारी सचिव प्रा. प्रकाश पांगम सरांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व शिक्षक यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ, उपप्राचार्य प्रा.आर.व्ही.पवार, भूगोल विभाग प्रमुख लेफ्टनंट संदीप भिसे , डॉ बाळासाहेब तांबे , प्रा. ललित कळसकर, प्रा. दिपाली सूर्यवंशी  हे विराजमान होते. या उपक्रमासाठी आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.दीपक नाईक सरांचे मार्गदर्शन लाभले.

पृथ्वीवरील मानवी कृतीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्या, त्यातून वाढलेले उष्णतामान याचा मानवाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याची माहिती करून दिली. उन्हात जास्त वेळ थांबू नये, डोक्यावरती पांढरे वस्त्र, सुती व सैल कपडे परिधान करावे. सोबत पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी, दर तासाने सातत्याने पाणी पीत जावे, शरीर थंड ठेवण्यासाठी लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक अशा पदार्थांचे सेवन करत जावे. हे आरोग्यास हितकारक आहे याची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी घराच्या बाहेर पडू नये, तसेच शिळे अन्नही खाऊ नये. आपल्या आरोग्यासाठी शरीरात रक्तामध्ये लोहाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी लोह घटक युक्त पालेभाज्या, शेपू, पालक यांचा आपल्या आहारात समावेश करावा. जाहिरातीमध्ये दाखवलेली शीतपेय आरोग्यास त्यातील कार्बन वायूमुळे हानिकारक आहेत. याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना एनसीसी कॅम्प मध्ये आरोग्य स्वच्छता या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपल्या रक्तातील लोहाचे प्रमाण, हिमोग्लोबिन त्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे अनेमिया, थॅलेसेमिया तसेच उष्माघात व घ्यावयाची काळजी यासारख्या आजारांविषयी जागृती निर्माण केली.  या महाविद्यालयात 110 राष्ट्रीय सत्र सेनेचे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. राष्ट्राच्या संरक्षण दलात मध्ये भरती झालेल्या छात्रांचे त्यांनी कौतुक केले.

तरुणांनी आपल्या आरोग्य विषयी जागृत राहणे गरजेचे आहे. आपल्या पोटामध्ये विविध मार्गाने प्रवेश करणारे जंत, त्याचे नियंत्रण करण्यासाठी जंताची औषधे नियमित घ्यावीत व स्वच्छता बाळगावी याची माहिती प्रा. प्रकाश पांगम सरांनी विद्यार्थ्यांना करून दिली.विशेषतः मुलींनी आपल्या मासिक पाळीच्या कालावधीत लोहयुक्त आहार ,ज्यामध्ये गुळ –शेंगदाणे, काळे मनुके, खजूर ,पालेभाज्या यांचे सेवन शरीराची झीज भरून काढण्यासाठी गरजेचे आहे. याविषयी तरुणींमध्ये जागृती निर्माण केली. मुलींनी आपल्या आईला मैत्रीण समजून तिच्याशी संवाद साधला पाहिजे. तसेच आपल्या फॅमिली डॉक्टरशी याविषयी बोलले पाहिजे. असेही मत याप्रसंगी प्रा. प्रकाश पांगम सरांनी व्यक्त केले.आपल्या धर्मशास्त्रानुसार जे संस्कार आपल्या पृथ्वी, धरणीमाता, मातृभूमी विषयी जीवनशैली व्यक्त केली आहे, याची ओळख करून दिली. प्राणीमात्र, पंचतत्व याविषयी जागरूकता आपल्या ऋषीमुनींनी, साधुसंतांनी आपल्या जीवनशैलीतून दाखवून दिली आहे. आपण निसर्गाचा केवळ आपण उपभोग घेत आहोत, त्याची काळजी घेतली पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशव्या पर्यायी म्हणून वापरल्या पाहिजेत. पुनर्वापर हा यातील महत्त्वाचा भाग आहे. आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपले मानसिक आरोग्य पृथ्वीच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे. असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पीव्ही रसाळ सर यांनी व्यक्त केले.वसुंधरा दिन त्याचे ऐतिहासिक महत्त्व, सुरुवात, इतिहास व सध्या होत असलेले बदल व चालू वर्षाचे या दिनाचे बीज वाक्य ‘Planet vs Plastic’ याविषयी लेफ्टनंट संदीप भिसे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती करून दिली. पाहुण्यांचा परिचय प्रा. ललित कळसकर  यांनी केला. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दिपाली सूर्यवंशी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वंदना बोराडे व कुमारी दिव्या आंधळे या विद्यार्थिनींनी केले.

 

Comments are closed.