आश्रय सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट,ठाणे व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर,जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक झाड आईसाठी’ मोहीम (दि. ०६.०८.२०२४)

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट आणि गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, महाविद्यालय सिन्नर, नाशिक साजरा येथे’वसुंधरा दिन- 22 एप्रिल’- ‘Planet vs Plastic’ साजरा.
January 9, 2025
आश्रय सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे व गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला महाविद्यालय सिन्नर यांच्यातील सामंजस्य करारातून समाजापुढे आदर्श निर्माण होणार – डॉ.दीपक मोरेश्वर नाईक
January 9, 2025

 

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे व  मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक सस्ंथेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडकेर कला, भगवतंराव वाजे  वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक यांच्यामध्ये झालेल्या सामजंस्य करारानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘एक झाड आईसाठी’ वृक्षारोपण मोहिमेने सुरुवात झाली. महाविद्यालयाचा परिसर अजनू हिरवागार करण्यासाठी २०० वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. मगंळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.आश्रय सामाजिक सांस्कृतिक शक्षैणिक ट्रस्ट चे  सस्ंथापक डॉ.दिपक मोरेश्वर नाईक यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी स्थानिक वृक्ष वड, पिपंळ, चिचं,जांभळू, कडुनिंब यासारख्या ५० वृक्षांची लागवड करण्यासाठी ७०००/- रुपयांची मदत केली. आपल्या धरणी मातेच्या मातृभूमी ऋणातून मुक्त होण्यासाठी,  आपल्या आईसाठी एक वृक्ष लागवड व संवर्धन  ही मोहिम महत्त्वाची ठरणार आहे.

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्ष संवर्धनातून माती,पाणी, प्राणी पशपुक्षीचेही संवर्धन होते. भविष्यातील तापमानवाढ कमी करण्यासाठी व मानवी जीवन आनंदी,   आरोग्यादायी ठेवण्यासाठी प्रत्येकाने किमान एका वृक्षाची लागवड करून त्याची जपणुक केली पाहीजे असे मत मा.संचालक श्री.कृष्णाजी भगत यांनी व्यक्त केले. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी युवकांनी पुढे येऊन आपली मातृभूमीच्या संरक्षणासाठी वृक्ष लागवड व जतन करण्याची सामाजिक जबाबदारी निभवावी. आपल्या घरासमोर, अंगणात, शेताच्या बांधावर, माळरान, सोसायटीच्या प्रांगणामध्ये, शाळा, महाविद्यालय, शासकीय जागेवर वृक्षांची लागवड करावी. वृक्ष आपल्याला मातेसारखे शितल छाया , फळे, फुले देऊन आपले जीवन आनंदी करतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईसाठी एक झाड लावून पृथ्वीच्या पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल उचलावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ सर यांनी केले.

महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेषात महाराष्ट्राच्या वारकरी-संत परंपरेचे रिंग सोहळा, अभंग गायन हा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी आश्रय सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टचे नाशिक विभागातील प्रोफेसर प्रकाश पांगम, डॉ.मनीष ठक्कर (जनरल मेडिसिन), डॉ.कुसुम कुंटे (एमडी स्त्री रोग तज्ञ) हे याप्रसंगी उपस्थित होते. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सिन्नर तालुक्याचे संचालक श्री.कृष्णाजी भगत साहेब उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ.पी.व्ही.रसाळ , उपप्राचार्य – प्रा. आर. व्ही. पवार प्रा. दिपाली सूर्यवंशी, एनसीसी प्रमुख लेप्टनंट संदीप बाळासाहेब भिसे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी आर. एम. अंबेकर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. ललित कळस्कर, प्रा. आर. टी. सोनवणे, रोवर रेंजर अधिकारी दीपक खुरचे, सास्कृतिक कलामंच प्रमुख प्रा. जावेद शेख, प्रा. भारस्कर, हो. प्रा.बी. यू. पवार  हे प्रसंगी उपस्थित राहीले.महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी टाळ, पखवाज, भगवी ध्वज पताका घेऊन विठ्ठल नामाच्या गजरात पालखी व रिगंण सोहळा पटांगणात उत्साहात सादर केला.या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वृक्षाची दिंडी काढण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेना (NCC, ARMY WING) , राष्ट्रीय सेवा योजना (NSS) रोवर – रेंजर स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘एक वृक्ष आईसाठी’ या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.राष्ट्रीय छात्र सेना (NCC, ARMY WING) प्रथम वर्ष भरती प्रक्रिया निवडपूर्व, जास्तीत सहभागी होत असलेल्या छात्रांना आश्रय ट्रस्टच्या वतीने प्रोफेसर प्रकाश पांगम, डॉ.मनीष ठक्कर –  जनरल मेडिसिन, डॉ. कुसुम कुंटे यांनी ॲनिमिया ,थँलेसेमिया याविषयीची जाणीव व जागृती निर्माण करून त्यांच्याशी हितगुज साधले. डॉ. कुसुम कुंटे यांनी राष्ट्रीय छात्र सेनेत भरती होण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना आपल्या आहारात कोणते घटक महत्वाचे आहेत? महिलांचे प्रश्न व आरोग्याविषयी जागृती करत विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरे देऊन, त्यांच्या मनातील शंका दूर केल्या.

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे व सिन्नर महाविद्यालय वर्षभरात आरोग्य शिबिरे, रक्तदान, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक- सार्वजनिक समाज उपयोगी उपक्रम राबविणार

आहे. यातुन समाजातील विविध स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना याचा प्रत्यक्षपणे लाभ होणार आहे. असे महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.पी व्ही रसाळ सर यांनी आपले मत व्यक्त केले. प्रा. आर.व्ही.पवार उपप्राचार्यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.

 

 

Comments are closed.