They wait for your help
सामाजिक कार्य
सांस्कृतिक कार्य
शैक्षणिक कार्य
कोणताही एकटा व्यक्ती समाज परिवर्तन करू शकत नाही . समाज परिवर्तनासाठी सर्व सामाजिक घटकांची आवश्यकता असते. संस्था सुरु करण्या अगोदर सामाजिक कार्यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या. पण संस्था सुरु झाली . संस्थेची उदिष्ट्ये निश्चित करण्यात आली . आणि अनेकांचा हातभार लागला . त्यामुळे सामाजिक कार्याचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आली . संस्थेमध्ये असलेल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आणि आपल्यासारख्या असंख्य हितचिंतकांच्या पाठींब्यामुळे सुलभ होत आहे. अजूनही संस्थेला अनेक उपक्रम राबवायचे आहेत. फक्त आपला आशीर्वाद , मार्गदर्शन आणि लोभ संस्थेवर आणि आमच्यावर कायम राहावा हीच अपेक्षा .
About Ashray Trust
समाजाशी बांधिलकी म्हणजे काय ?
कुटुंबात राहून ज्याप्रमाणे समाधान प्राप्तीसाठी परमेश्वराची आपण भक्ती करतो, आराधना करतो. नित्यनेमाने दर दिवशी देवपूजा करतो. व एक प्रकारे मानसिक समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे समाजाचे आपल्यावर असलेले प्रचंड ॠण लक्षात घेऊन नित्यनेमाने दर दिवशी आपल्याला जमेल त्या स्वरुपात सामाजिक कार्य करणे हे होय.
सामाजीक कार्य कसे करावे?
गोर-गरिबांना आर्थिक मदत करणे , खेडोपाड्यात दिवाबत्तीची सोय उपलब्ध करून देणे , विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव निर्माण करून देणे आणि चांगल्या व हुशार विद्यार्थ्यांचा गौरव करणे असे विविध कार्यक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप , गणवेशवाटप , आश्रमातील विद्यार्थ्यांना फळवाटप , तरुणांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला संस्थेने सुरुवात केली आहे.